Breaking
AISF नाशिकच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांमार्फत २३४ घरकामगार मोलकरणींना अत्यावश्यक सामग्रीची मदत थेट


नाशिक : संदीप फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील व त्यांच्या टीमच्या सहकाऱ्यांने ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (AISF) नाशिकच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांद्वारे शहरातील २३४ घरकामगार मोलकरणींना अत्यावश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले. 


आयटक कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड राजू देसले व घरकामगार मोलकरीण संघटनेच्या नेत्या मीना आढाव यांच्या नेटवर्कमुळे, तसेच मीना आढाव यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे हे शक्य झाले.

एस्पँलीअर हेरिटेज स्कुलचे संस्थापक सचिन जोशी यांनी उपलब्ध करून दिलेल्या चारचाकीमुळे ही मदत वस्त्या वस्त्यांमध्ये पोहोचवणे शक्य झाल्याचे एआयएसएफ ने म्हटले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा