Breakingमाकप महिला आघाडीच्या वतीने दापोडी येथे अनाथ गरजू घर कामगार महिलांना अन्नधान्याचे वाटप


पिंंपरी चिंचवड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दापोडी येथे अनाथ गरजू घर कामगार महिलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.


अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पिंपळे गुरव शाखेच्या कार्यकर्त्या योगिता कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राम माने यांनी तांदूळ आणि गहू वितरित केले. या वस्तीत विधवा, अनाथ तसेच लॉक डाऊन मुळे काम नाही अशा कुटुंबांना या पुढील काळात मदत देण्यात येईल, असे आश्वासन योगिता कांबळे यांनी दिले आहे.


कोणालाही उपाशी राहू देणार नाही आणि कोणाचीही चूल बंद पडू देणार नाही या मोहिमे अंतर्गत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आकुर्डी शहर कार्यालयामार्फत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, सेंटर ऑफ ट्रेंड युनियन, जनवादी महिला संघटनेच्या वतीने गरजूना मदत करा असे आवाहन करण्यात येत आहे.

या मोहिमेत कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, अमिन शेख, दिलीप पेटकर, सोनाली मन्हास, शैलजा कडुलकर, नूरजहाँ जमखाने, सुषमा इंगोले, शेहनाज शेख यांनी पैसे नकोत; धान्य द्या, असे आवाहन केले आहे.


घरकुल वसाहत, से 16 प्राधिकरण, आकुर्डीगाव, निगडी, चिंचवड, कृष्णानगर या विभागातील मध्यम वर्गीय हितचिंतकांनी आवाहनाला प्रतिसाद दिला असल्याचे ही क्रांतिकुमार कडुलकर यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा