Breaking
अक्षय मोरे यांची बिरसा क्रांती दलाच्या वैजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड


औरंगाबाद : अक्षय मोरे यांची बिरसा क्रांती दल वैजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. 


औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार यांच्या मेहनतीने वैजापूर तालुका शाखा तयार करण्यात आली आहे. अक्षय मोरे यांना बिरसा क्रांती दलाचे काम आवडले व सुशिलकुमार पावरा सह मनोज पावरा व इतर युवा पदाधिकारी यांच्या कामाने ते प्रभावित झाले. त्यांनी बिरसा क्रांती दल संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणूनच केशव पवार जिल्हाध्यक्ष औरंगाबाद यांच्या शिफारशीने अक्षय मोरे यांची आदिवासी समाजाबद्धलची काम करण्याची तळमळ बघून त्यांना वैजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

वैजापूर तालुका शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

तालुका अध्यक्ष अक्षय मोरे, उपाध्यक्ष शाम मोरे , महासचिव शिवाजी शेळके व उर्वरित  100 पेक्षा अधिक तालुका सदस्य निवड करून सभेत जाहीर करण्यात आले. सभेत तरसाळी, पिंपळदर, यशवंतनगर, तोरणेखुर्द इत्यादी गाव शाखा व वैजापूर तालुका शाखा निवड करून जाहीर करण्यात आल्या. 

या सभेला बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभाग प्रमुख  मनोज पावरा, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे, धुळे जिल्हा सचिव विलास पावरा, शिरपूर तालुका सचिव गेंद्या पावरा, साहेबराव पावरा, बागलाण तालुका अध्यक्ष दादाजी बागूल, उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड, महिला प्रतिनिधी महेश्वरी, अशोक पवार तालुका पदाधिकारी, तालुका पदाधिकारी सहारे, पेठ तालुका अध्यक्ष मधूकर पाडवी, पुणे जिल्हा संघटक चिंधू आढळ, तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष संपत वसावे, ठाणे जिल्हा महासचिव अनंता जाधव, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार, नवापूर तालुका अध्यक्ष राजेश वळवी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा