Breaking
अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज विहीत मुदतीत दाखल करण्याचे आवाहन !


मालेगाव दि.27 : मालेगाव अजंग-रावळगाव टप्पा क्रमांक 3 या औद्योगिक क्षेत्राकरिता गुरुवार, 10 जून 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती व अर्ज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून तालुक्यातील उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.


अजंग-रावळगाव औद्योगिक क्षेत्र वाटपासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सरळ पद्धतीने औद्योगिक भूखंड वाटप अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता राखीवसह “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” (As is where is basis) वर वाटप करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अजंग-रावळगाव टप्पा क्रमांक-3 या औद्योगिक क्षेत्रासाठी 80.73 हेक्टर आर. क्षेत्रात सुमारे 393 भूखंड वाटपास उपलब्ध असल्याचेही मंत्री भुसे यांनी नमूद केले आहे.

भूखंडांची संख्या व क्षेत्रामध्ये बदल करण्याचे अधिकार महामंडळाने राखून ठेवले असून यासाठी अटी व शर्ती लागू राहतील, अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळ www.midcindia.org पहावे, तर कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी या कार्यालयाचा संपर्क क्रं. 8422944043 यावर संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा