Breaking
शेतकरी आंदोलन : पंजाबच्या शेतकऱ्यांची दुसरी तुकडी दिल्लीच्या सिंघु सिमेवर परतली !किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी दाखल !


नवी दिल्ली : आज २९ मे रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पंजाब मधील शेकडो शेतकऱ्यांची दुसरी तुकडी आपली गव्हाची कापणी पूर्ण करून दिल्लीजवळ सिंघु सीमेवर परतली. पहिली तुकडी १६ मे रोजी पोचली होती. 


सिंघु येथे तिचे स्वागत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद यांनी केले. यावेळी पंजाब किसान सभेच्या नेत्यांमध्ये सरचिटणीस मेजर सिंग पुनेवाले, उपाध्यक्ष धरमपाल सिंग सील, सहसचिव गुरमिक सिंग फजाल, कोषाध्यक्ष बलदेव सिंग लटाला, राज्य कमिटी सदस्य बलजीत सिंग ग्रेवाल, सीटूचे नेते महेंद्र कुमार, जमसंच्या नेत्या सुभाष मट्टू आणि हरियाणा किसान सभेचे नेते एस. एन. सोलंकी हे उपस्थित होते.


लाल झेंडे घेऊन किसान सभेची रॅली सिंघु सीमेवरील विस्तीर्ण शेतकरी कॅम्पमधून ५ किलोमीटर चालत मुख्य स्टेजपर्यंत आली आणि तिथे संयुक्त किसान मोर्चातर्फे जाहीर सभा झाली. यावेळी डॉ. अशोक ढवळे व पी. कृष्णाप्रसाद यांंनी शेतकऱ्यांना संबोधित केले.येत्या ५ जूनला, ज्या दिवशी गेल्या वर्षी मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे अध्यादेशांच्या स्वरूपात प्रथम काढले, त्या दिवशी तिन्ही कायद्यांची होळी करण्याचा संयुक्त किसान मोर्चाचा निर्णय डॉ. अशोक ढवळे यांनी जाहीर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा