Breaking
रिक्षाचालकांसाठी आधुनिक प्रणाली तयार करण्याची गरज - काशिनाथ नखातेपिंपरी : राज्य शासनाकडून मिळणारे पंधराशे रुपये अनुदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुरुवात आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करण्यात आली. शहरातील थरमॅक्स चौक, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर या ठिकाणी मोफत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली.

 

रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड व कष्टकरी संघर्ष महासंघ आयोजित कार्यक्रमात स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले नोंद पावत्याचे वाटप केले , रिक्षा पंचायत सरचिटणीस नितीन पवार, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नागरी हक्क समितीचे प्रदीप पवार, बाबासाहेब चव्हांण, शैलजा चौधरी, अशोक मिर्गे, काशिनाथ शेलार, राजाभाऊ बोराडे, भीमराव साबळे, अतिश वडमारे, रत्नाकर कांबळे, आश्रुबा सुरवसे, विकास मोरे, तुषार पारखे, रामा बिरादार, रमेश कारके आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते.


नितीन पवार म्हणाले "कोरोना कालावधीमुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले असून मागच्या वेळेला रिक्षा बंद होत्या आता रिक्षा चालू आहेत पण व्यवसाय नाहीये दिवसभर फिरून हे तुटपुंजे पैसे जमा होतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रिक्षाचालकांना तातडीने लाभ द्यावा."मानव कांबळे म्हणाले "आपल्या मागण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो आहे यापुढे अधिक रक्कम मिळवण्यासाठी संघर्षासाठी आपण सर्वजण तयारी करू शासनाने या कालावधीमध्ये अधिक कागदपत्रे अथवा अडचणी निर्माण होईल अशा नियम न लावता संकट काळ आहे म्हणून सरळ सरळ  मदतीची भावना ठेवावी आणि लवकरात लवकर लाभ घ्यावा."


काशिनाथ नखाते म्हणाले "रिक्षाचालकांसाठी  आधुनिक प्रणाली तयार करण्याची गरज आहे अशा संकटाच्या वेळा पुढे येऊ शकतात त्यामुळे शासकीय परवाने परमिट आणि बँक खात्याचे इत्यंभूत माहिती ही शासनाकडे असणे गरजेचे आहे त्यासाठी त्याचा डाटा संकलित करावा आणि यापुढे अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ करून त्यांना जलद गतीने लाभ द्यावा, विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रांमध्ये जाऊन आपण लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा