Breaking
आंबेगाव : अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या


आंबेगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन जाधवांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली.यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता याची आर्थिक वादातून हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या पैश्यांच्या देवाण - घेवाणीतून झाल्याचं पोलीस तपासात समोर निष्पन्न झाले. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या पोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली.

तपास पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार जाधव यांच्याच गाडीत आरोपीने जाधव यांचा मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने नेली. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथंच दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली व पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. या गुन्ह्यातील आरोपींंच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला यश आहे.


यामध्ये गुन्ह्यामध्ये विजय अनिल सुर्यवंशी, निलेश मारुती माळी, निलेश दादाभाऊ बर्डे यांना अटक करण्यात आली असून गुन्हाची कबुली दिली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व मंचर पोलीस यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे. मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक सागर खोबाले, पोलीस नाईक नवनाथ नायकवडी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अमोल गोरे, सचिन गायकवाड, काशिनाथ राजापुरे, पोलीस नाईख दिपक साबळे, अजित भुजबळ, मंगेश ठिगळे व अन्य सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा