Breaking
SFI चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही. शिवदासन यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड


केरळ : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) माजी राष्ट्रीय अध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळ वीजनिर्मिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. शिवदासन यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नुकतीच निवड झाली आहे. राजसभेच्या केरळमधून रिक्त झालेल्या जागांसाठी एप्रिलच्या शेवटी निवडणूक झाली. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. व्ही. शिवदासन यांना संधी देण्यात आली आहे.


शिवदासन हे एक डॉक्टरेट, अभ्यासू, लढाऊ तरुण नेतृत्व म्हणून विद्यार्थी राजकारण ते पक्षीय राजकारण अशी वाटचाल राहिली आहे. ते जानेवारी २०१६ पर्यंत एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्यात समाजाकडे बघण्याचा, त्यांचे प्रश्न जाणण्याचा आणि त्यांना लढ्यात उतरवून न्याय देण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. 

माकपने त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतील आणि राज्यसभेचे खासदार म्हणून ते जनतेच्या लढ्यांना आणि प्रश्नांना संसदेत मांडून न्याय देतील, अशी प्रतिक्रिया SFI चे महाराष्ट्र राज्य महासचिव रोहिदास जाधव म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा