Breaking
७० वर्षात मिळवले ते ७ वर्षांत गमावले काँग्रेसची खोचक टीका


मुंबई : केंद्रात सत्तेत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (३० मे) रोजी आपला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी हे सगळ्यात अपयशी नेते असल्याची टीका केली आहे.


सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नरेंद्र मोदी सगळ्यात अपयशी नेते आहेत. ते सपशेल नापास झाले आहेत. देशाची आर्थिक अधोगती व जगात नाचक्की झाली असल्याची टीका केली आहे. तसेच संस्थांची विश्वासार्हता व लोकशाही रसातळास जाऊन द्वेष, महागाई व बेरोजगारी भयानक वाढली आहे, मोदी मित्र गब्बर व लोक गरीब झाले आहेत. ७० वर्षात मिळवले ते ७ वर्षांत गमावले अशीही खोचक टीका सावंत यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा