Breakingसंपूर्ण देशभरात ३ मे ते २० पर्यंत लॉकडाउनची घोषणा? पीआयबीने दिलं स्पष्टीकरणनवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच सोशल मीडियावर देशभरात संपूर्ण लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. 

 

 करोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात ३ मे ते २० मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली असल्याचा दावा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जात आहे. मात्र यावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने केंद्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.


त्यामुळे ३ मे ते २० मे दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाउन करणार असल्याचे वृत्त खोटं असल्याचं पीआयबीच्या स्पष्टीकरणामुळे समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा