Breaking
घाटघर : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी ठेकेदाराला विचारला जाब


जुन्नर (पुणे) : घाटघर येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. घाटघर येथे बस स्थानक ते नानेघाट असा 3 कि.मी च्या रस्त्याचे काम चालू आहे.  


घाटघर येथे जीवधन तसेच सातवाहन काळातील नानेघाट हे प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. आणि जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणूनही घोषित झाला आहे. तसेच घाट माथ्यावर असणारे नानेघाट (घाटघर) या ठिकाणी पावसाचे प्रमाण ही जास्त असते. मात्र रस्त्याचे काम हे निष्कृष्ट होत असल्यामुळे गावातील तरुण नाराज झाले आहेत. मात्र ठेकेदार शेवाळे यांनी याबद्दल कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया देणे टाळले.

मात्र गावातील तरुणांनी यावर तीव्रर संताप व्यक्त केला आणि नेहमीच विकास कामाच्या माध्यमातून आदिवासी भागातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम ठेकेदार करत असतात,  मात्र या कामांकडे लोकप्रनिधिनी लक्ष घालण्याची मागणी  देखील ग्रामस्थांनी केली आहे. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य चिंधा घोयरत, अनिल रावते, विकास रावते, शिवाजी लोखंडे, मनोहर नांगरे, धर्मा आढारी, अजिंक्य खरात, चिंतामन कोकणे, बाळू वाळकोळी हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा