Breaking
घोडेगाव : SFI तर्फे परिचारिका ज्योती वाळुंज यांचा जाहीर सत्कार


आंबेगाव (पुणे) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI), किसान सभा व आदिम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका ज्योती वाळुंज यांचा सत्कार करण्यात आला.


घोडेगाव ता.आंबेगाव जि. पुणे येथील ग्रामिण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या व रुग्णांची अत्यंत प्रेमाने,आपुलकीने व माणुसकीचे नाते जपत प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या परिचारिका ज्योती वाळुंज यांचा डॉ.श्रीमती काळे यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी SFI संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, SFI आंबेगाव तालुका सचिव समिर गारे, आदिम संस्थेचे अनिल सुपे, अर्चना गवारी, किसान सभेचे राजु घोडे, पत्रकार निलेश कान्नव हेही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा