Breakingग्रीस : ९० किमी जंगल खाक करून वणवा मानवी वस्तीपर्यंत पाेहोचलाअथेन्स १४,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले, अटिगा क्षेत्रातील ६ गावे खाली


ग्रीस : ग्रीसच्या अटिगा प्रदेशातील जंगलात बुधवारी उशिरा रात्री वणवा पेटला. पाहता-पाहता १२ तासांत ९० किमीचे जंगल क्षेत्र खाक झाले. गुरुवारी हा वणवा मानवी वस्तीत दाखल झाला. वणव्यामुळे ६ गावांसह सुमारे १४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.


अग्निशमन दलाचे प्रमुख स्टेफानोसा कोलोकोरिस म्हणाले, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरातून सुरक्षा दल पाठवले जात आहे. आग विझवण्यासाठी १८२ अग्निशमन दलाचे जवान, ६२ बंब, १७ विमाने, तीन हेलिकॉप्टर युद्धपातळीवर कार्यरत आहेत. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात यश येईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


२०१८ मध्ये १०२ लाेकांचा मृत्यू


ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये २०१८ मध्ये देशातील सर्वात भीषण वणवा लागला होता. नैसर्गिक आपत्ती म्हणून तेव्हा जाहीर करण्यात आले होते. तेव्हा यात १०२ जणांचा मृत्यू झाला होता. ही आग अथेन्सच्या मायटी भागात लागली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा