Breaking
आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोविड सेंटरला मदतराजूर (अकोले) : आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या हेतूने सांदण आदिवासी लोकचळवळ संगमनेर यांच्यावतीने राजूर येथील कोविड सेंटरला  औषोधोपचाराची आवश्यक ती मदत करण्यात आली.


सांदण आदिवासी लोकचळवळ संगमनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी भागात उभारण्यात आलेल्या शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह राजूर येथील कोविड सेंटरला सह्याद्रीचा वाघ आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त औषध उपचारांची मदत करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकवर्गणीतून उभारलेल्या या कोविड सेंटरला अनेक स्तरांतून वेगवेगळ्या रुपाने मदत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सांदण आदिवासी लोकचळवळीच्या माध्यमातून या कोविड सेंटर मधील सर्व रुग्णांसाठी सामाजिक दायित्व भावनेतून वैद्यकिय आधिकार्‍यांच्या सल्याने  मोफत संपूर्ण औषधोपचार किटचे वाटप करण्यात आले. 


यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र विठे येथील डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. शेळके, आधिपरिचारीका श्रीमती ए. एम. कोकाटे उपस्थित होते. सांदण आदिवासी लोक चळवळीचे अध्यक्ष अरविंद सगभोर, सचिव किरण बांडे, बापू देशमुख, विजय कोंडार, हरिश साबळे, भारत बांडे, पत्रकार युवराज हांगेकर याच्या उपस्थित मदत देण्यात आली. 


याकामी सांदण आदिवासी लोकचळवळीचे भाऊराव धोंगडे, प्रकाश मधे, गणेश शेंगाळ, सुनील भवारी, रवी पिचड, तुकाराम कोरडे, संजय ठोकळ, दशरथ गभाले, भाऊसाहेब वेडे, बाळासाहेब डगळे, बाळु इदे, संतोष भांगरे, एकनाथ खाडे, निवृत्ती घोडे, संजय गवळी गणपत गंभिरे, काशिनाथ सगभोर यांनी आर्थिक योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा