Breaking
स्मशानभूमीतील गर्दी, महागडे लाकूड यामुळे शेकडो मृत देहाचे गंगेच्या वाळूत दफनअलाहाबाद : प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर दफन केलेल्या शेकडो मृतदेहांचे फोटो आणि व्हीडिओ मागच्या आठवड्यात जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. मृतांच्या आकड्यांवरून लोक प्रश्न विचारत होते, तेव्हा शहरात असणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री महेंद्र प्रताप सिंह यांनी याला 'प्रयागराजची जुनी परंपरा' असं म्हटलं.


प्रयागराजच्या श्रृंगवेरपूर धामजवळ गंगेच्या किनाऱ्यावर दोन किलोमीटरच्या परिसरात इतके मृतदेह दफन केले गेले की त्यांची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं.


मृतदेहांचं दफन करण्यात इतकी घाई केली की मृतदेहांवर टाकलेली वस्त्र बाहेर आली होती. काही शवांचे अवयव बाहेर आले होते आणि प्राणी त्यांचे लचके तोडून खात होते. या मृतदेहांवर गिधाडं आणि कावळे घिरट्या घालत होतं.


हीच परिस्थिती प्रयागराजच्या फाफामऊ, झूंसी, दारागंज आणि इतर काही घाटांवरही दिसली. याआधी उन्नाव, फतेहपूर, कानपूर आणि रायबरेलीमध्ये मृतदेह वाळून गाडलेले दिसले. त्याआधी गंगा आणि यमुनेतही मोठ्या प्रमाणात मृतदेह तरंगताना दिसले. गावांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कसे झाले आणि हे मृतदेह कोणत्या गावांचे आहेत, हे लोक कोण आहेत याबद्दल अजूनही पत्ता लागलेला नाही.


प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानुचंद्र गोस्वामी म्हणतात की, हे मृतदेह सापडलेले नाहीत. उलट लोक त्यांना स्वेच्छेने इथे दफन करून गेलेत. लोक अनेक वर्षांपासून असं करतात.


त्यांच्या मते, "हे काही नवीन नाही. इथे सगळ्या लोकांना असं होतं हे माहितेय. काही समुदायांमध्ये ही परंपरा आहे. काही लोक साप वगैरे चावून मृत्यू झाला तरी अशाच प्रकारे मृतदेह दफन करतात. अर्थात आम्ही टीम बनवून लोकांना जागरूक करतोय की त्यांनी या मृतदेहांचं दहनच करावं म्हणजे प्रदूषण होणार नाही."


उन्नावच्या बक्सर घाटाबाहेर अंत्यसंस्कारांचं सामान विकणारे दिनकर साहू इतक्या मोठ्या प्रमाणात दफन केलेल्या मृतदेहांबद्द्ल बोलताना म्हणतात, "स्मशानभूमीत असणारी गर्दी आणि महागडं लाकूड यामुळे गरीब लोकांनी शवांचं दफन करणं सुरू केलं आहे. गंगेच्या वाळूत अनेक मृतदेहांचं दफन होताना दिसून येतं. नेहमीच असं होतं असं नाही, पण ज्यांनी हे केलं असेल त्यांचा नक्कीच नाईलाज झाला असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा