Breaking
तौते चक्रीवादळाचा रौद्रवतार ! झाडं कोसळली, घरं कोलमडली, पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारातौते चक्रीवादळाने हळूहळू रौद्र रुप धारण करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीच्या टप्यात दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झालं. मात्र, आता त्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं असून, केरळ, तामिळनाडूमध्ये त्याचा तडाखा जाणवण्यास सुरूवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक घरांचं नुकसान झालं आहे. 


झाडं कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळातील मालापूरम कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळच्या किनारपट्टी भागात तौते चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. केरळमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून, किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.


केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून , सध्या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे.


कोकण किनारपट्टी लगत गावांना "हाय अलर्ट


महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही दक्षता घेतली जात आहे. कोकण किनारपट्टी लगत असलेल्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, चक्रीवादळासंबधी गावोगाव जनजागृती केली जात आहे. 


महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दूरपासून हे वादळ जात असलं, तरी त्याचा परिणाम होईल, असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून , सध्या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे.


 आमदाराची किनारपट्टीवर पाहणी, परिस्थितीचा घेतला आढावा


डहाणू मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी किनारपट्टी भागाची पहाणी केली. तसेच मच्छीमार आणि प्रशासनालाही सुचना केला. तसेच सध्या स्थितीचा आढावा घेतला.  पुणे जिल्ह्यातही जोराच्या वाऱ्यासह तुरळक पाऊस 


पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यात जोराच्या वाऱ्यासह तुरळक पाऊस पडला. चक्रीवादळाचा तडाखा या भागाला बसणार नसला तरी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी "निर्सग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील मोठे नुकसान झाले होते.


१८ मे रोजी गुजरातमध्ये धडकण्याचा अंदाज !


अरबी समुद्रातील चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून जवळपास तीनशे किमी अंतरावर आहे. येणाऱ्या कालावधीत त्याचं रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची अंदाज असून, अरबी समुद्रातून याचा प्रवास सुरू होईल आणि गुजरातच्या किनारपट्टीवर १८ मे रोजी धडकेल.


रेल्वेही रद्द, प्रशासनाचा निर्णय !


तौते चक्रीवादळाच्या इशारामुळे गुजरात पश्चिमच्या रेल्वे गाड्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान १७ व १८ मे रोजी या रेल्वे गाड्या बंद राहतील. त्यासंबंधीचे वृत्त "एएनआय" दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा