Breakingमोठी बातमी : चक्रीवादळ अधिक सक्रीय ! मध्य महाराष्ट्रसह 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : महाराष्ट्रातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत जोरदार पावसाची शक्यता असल्याच हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल आहे.  


अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी तयार झाले असून त्याचे सोमवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात २४ व २५ मे रोजी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात पाऊस झाल्याने कमाल तापमानाचा पारा झपाट्याने खाली होता. तर शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात सकाळपासून अंशतः ढग दाटले होते. त्यामुळे राज्यातील वातावरणातील उकाडा चांगलाच कमी झाला होता. 


राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता : 


२३ मे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र 


२४ मे : रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक 


२५ मे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा 


२६ मे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा