Breaking
जिल्हा परिषद यांत्रिकी उपविभाग कार्यरत हातपंप / विजपंप कर्मचारी यांचा आकृतिबंधात समावेश करा, आयटकची मागणीनाशिक : जिल्हा परिषद यांत्रिकी उपविभाग कार्यरत हातपंप / विजपंप कर्मचारी यांचा आकृतिबंधात समावेश करणे किंवा वेतन व भत्ते शासनामार्फत मिळावेत, अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र  हात पंप दुरुस्ती, यांत्रिकी कर्मचारी संघटना वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद यांत्रिकी उपविभागात कार्यरत हात पंप/ वीजपंप कर्मचारी माहिती शासनास त्वरित पाठवावी.तसेच कार्यरत हातपंप/ वीज पंप कर्मचाऱ्यांना वेतन वाढ 7 व्या वेतन आयोग नुसार वेतन त्वरित लागू करावे. कोरोना काळात गाव पातळीवर जाऊन पंप दुरुस्ती देखभाल चे काम करत आहेत. याची दखल घेऊन प्रोत्साहन भत्ता, व 50 लाख रुपये विमा संरक्षण लागू करा, थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, कोरोना योध्यांंसाठी बेड राखीव ठेऊन मोफत आरोग्य सुविधा द्यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.


निवेदनावर राज्य कार्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र जगताप, राज्य उपाध्यक्ष सखाराम दुर्गुडे, दत्तात्रय अहिरे यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा