Breakingटोमॅटोच्या सदोष बियाणामुळे व्हायरसची लागण, शेतकऱ्यांची कारवाईची मागणीशेतात जणू आले प्लास्टिकचे टॉमेटो


नारायणगाव (जुन्नर) : टोमॅटोच्या सदोष बियाणामुळे व्हायरसची लागण झाली असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे.येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतातून विविध प्रकारचे शेती उत्पादन घेत असतात। जुन्नर तालुक्यात या वर्षी टोमॅटो या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. टोमॅटो हे उन्हाळी हंगामातील जुन्नर तालुक्यातील मुख्य नगदी पिक आहे. त्या पिकावर तालुक्याचे मोठ्या प्रमाणात अर्थकारण अवलंबून आहे. ह्या वर्षी देखील जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. ह्या वर्षी या पिकावर नवीन व्हायरस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याची लक्षणे टोमॅटो चालू होण्याचे वेळेस समजतात व टोमॅटो फळ प्लास्टिक सारखे आढळून येत आहेत.


नारायणगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे कि, हा दोष बियाणेचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरी सदर टोमॅटो पिकावर ह्या व्हायरसची लागण होण्याची कारणे व उपाययोजना ह्या संदर्भात सखोल लक्ष घालावे व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदन देतेवेळी नारायणगाव ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, येडगावचे उपसरपंच हर्शल गावडे, ग्रामपंचायत सदस्य अजीत नेहरकर, कृष्णाभाऊ काशीद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा