Breakingमास्क वितरणातून कोरोना सुरक्षितता जनजागृतीचा प्रारंभ - सुशिलकुमार चिखले


राजुर (अकोले) : योग प्राणायाम करुन स्वतःला निर्भय सुरक्षित बनवावे, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावा, मास्कचे काटेकोरपणे पालन करावे असे मनोगत राजा हरिश्चंद्र संस्थेचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी मास्क वितरण व कोरोना जनजागृती उपक्रमाच्या निमित्ताने कुमशेत गावातील नागरिकांना बोलताना मनोगत व्यक्त केले.


अकोले तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाढती संक्रमन क्षमता तीव्रता पाह ता त्याचा गंभीर परिणाम हा लहान मुलांवर होवु शकतो. त्यामुळे याचे गांभिर्य लक्षात घेत तरुणांचा आधार विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन गावो गावी मास्क वितरणासोबत कोरोना सुरक्षिततेची जनजागृती करण्याचा महासंकल्प करण्यात आला. सुरुवात अतिदुर्गम अश्या कुमशेत गावात नागरिकांना मास्क वितरणाबरोबर कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अत्यंत तीव्र असुन आपल्या आरोग्य व्यवस्था दुसन्या लाटेत हतबल झालेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावावा व आपल्या परिवारासोबत समाजाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या सकाळी लवकर उठुन व्यायाम करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले.

यावेळी कुमशेत चे सरपंच सयाजी असवले यांनी राजा हरीचंद्र बहुउद्देशीय संस्थेच्या या कार्याला शुभेच्छा देत नागरिकांना कोरोनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महेश शेळके, सचिव सद्गुरू देशमुख, सामजिक कार्यकर्ते संतोष बोटे, कार्तिक असवले, लालू असवले, बन्सी असवले व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा