Breaking
जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कोरोना रुग्णांना ने - आण करण्यासाठी रुग्णवाहिका अपुऱ्या, जिल्हा परिषद सदस्याने दिली स्कॉर्पिओ गाडी


जुन्नर (पुणे) : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील पश्चिम आदिवासी भागातील कोरोना रुग्णांना ने - आण करण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णांंना कोव्हीड केअर सेंटर येथे नेण्यासाठी तीन ते चार तास ताटकळत बसावे लागत होते.


दिवसेंदिवस जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी प्रशासनाने सोमतवाडी आश्रमशाळा येथे आदिवासी भागातील कोरोना रुग्णांसाठी "कोव्हीड केअर सेंटर" निर्माण केले आहे. परंतु रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी नेते देवराम लांडे यांनी आदिवासी बांधवांचे कोविड काळात रुग्णवाहिके अभावी होणारे हाल लक्षात घेऊन त्यांची स्वतःची स्कार्पिओ गाडी रुग्णसेवेकरिता दिली तसेच चालक व इंधन खर्च ते स्वतः करणार आहेत.

देवराम लांडे यांनी सोमतवाडी ( ता.जुन्नर ) कोविड सेंटर येथे रुग्णसेवेसाठी जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी एस.वाय.माळी, तालुका आरोग्य आधिकारी गोडे यांच्याकडे आपल्या स्कार्पिओ गाडीची चावी दिली. शिवाय त्या गाडीचा इंधन खर्चही ते स्वतः करणार आहेत. या कार्याचे आदिवासी बांधवांतून कौतुक होत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा