Breaking

इस्रायल - पॅलेस्टाईन घनघोर संघर्ष सुरूच, एका भारतीय महिलेचा मृत्यू


तेल अव्हीव - इस्रायलने गाझा पट्टीतील एका 13 मजली इमारतीवर क्षेपणास्त्रे सोडली होती. हा हल्ला करण्यापूर्वी इस्रायलने ही इमारत रिकामी करण्याची सूचनाही केली होती. या इमारतीवर हल्ला केल्याचा बदला घेण्यासाठी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर मंगळवारी पुन्हा क्षेपणास्त्रे सोडली. ही क्षेपणास्त्रे इस्त्रायलच्या एश्केलोन भागावर आदळली असून इथे राहात असलेल्या एका भारतीय नर्सचा मृत्यू झाला आहे.


या महिलेचे नाव सौम्या असून ती केरळमधील इडुक्की जिल्ह्याची रहिवासी असल्याचं कळालं आहे. आपल्या पतीसोबत व्हिडीओ कॉलवरून बोलत असतानाच तिच्या इमारतीवर क्षेपणास्त्र आदळलं होतं. पतीशी बोलत असतानाच जोरात आवाज आला आणि सौम्याचा फोन बंद झाला होता. तिच्या नवऱ्याने इस्रायलमध्ये राहणाऱ्या आणि ओळखीच्या असलेल्या इतर केरळी लोकांशी संपर्क साधला असता त्याला हल्ल्याबद्दल कळाले.

2017 नंतरचा इस्रायल आणि हमासमधला हा सर्वात मोठा संघर्ष आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने हा वाद निवळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र तूर्तास या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीये. नव्या वादाची सुरुवात ही महिनाभरापूर्वीपासून झाली आहे. जेरुसलेममधून पॅलेस्टीनी कुटुंबांना बाहेर हाकलण्याची धमकी दिली जात आहे. यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात वाद सुरू आहे.

जेरुसलेममधील अरबबहुल भाग हा आमचा असल्याचं ज्यूंचे म्हणणे आहे. यामुळे या भागात सतत तणाव आहे. शुक्रवारी जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीजळ या वादाने पुन्हा तोंड वर काढले. यामुळे इस्रायली पोलिसांनी बळाचा वापर केला. अल अक्सा मशीद ही मुसलमानांसाठी पवित्र ठिकाण आहे, तर ज्यूंसाठी पवित्र ठिकाण असलेले माऊंट टेंपल हे या मशिदीला खेटून आहे.

अल अक्सा मशिदीमध्ये जाण्यास निर्बंध लादण्यात आल्याने मुसलमान नाराज आहेत. रमझानच्या महिन्यात घडत असलेल्या या घटनांमुळे हमास भडकली असून याचा बदला घेण्यासाठी सोमवारी त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे सोडली होती. अल अक्सा मशिदीवर इस्रायलचे आक्रमण रोखण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे हमासचे म्हणणे आहे.

मंगळवारी रात्री काय घडले?

इस्रायलने गाझा पट्टीतील 13 मजली इमारतीवर क्षेपणास्त्रे सोडल्याने हमासने तल अवीव भागातील इमारतींवर क्षेपणास्त्रे सोडली. या हल्ल्यात 50 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हमासने सोडलेलं एक क्षेपणास्त्र रिकाम्या बसवर आदळलं, मात्र यात एक लहान मुलगा आणि 2 महिला जखमी झाल्या आहेत.


1 टिप्पणी:

  1. https://www.amazon.in/dp/B07K6KY47X/ref=cm_sw_r_cp_apa_i_KRM5Bb9MZ88NE
    नमस्कार.....! 🙏🏻🌹
    मी संतोष ठाकूर ( राजवाडे ) नाशिक, महाराष्ट्र
    माझ्या हिन्दी लिखाणातल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
    सदरच्या पुस्तकातील कथा अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. आणि वाचकांनाही पसंद येण्याजोगी आहे.
    ह्या हिन्दी पुस्तकाचे नाव *जानकी* असे ठेवले असून त्याचे प्रकाशन अमेझॉन या जग विख्यात कंपनीने केले आहे.
    सदरचे पुस्तक अमेझॉनच्या *किंडल* या प्ले बुक स्टोर वर उपलब्ध असून आपण माझ्या कथेला डाऊनलोड करून माझे लिखान कसे झाले त्याबाबत प्रतिक्रीया देण्याची माझी अपेक्षा आहे.
    सदरचे पुस्तक 👇 खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
    https://www.amazon.in/dp/B07K6KY47X/ref=cm_sw_r_cp_apa_i_KRM5Bb9MZ88NE
    पुस्तक वाचण्या करीता आपल्याला किंडल ऐप डाऊनलोड करावा लागेल त्या करीता 👇🏻 खाली दिलेल्या लिंक वरून अगोदर किंडल ऐप डाऊनलोड करून घ्यावा.
    https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.kindle
    कृपया पुस्तक वाचून आपली प्रतिक्रया जरूर कळवा.
    ह्या पुस्तकाची कथा आपल्याला सर्वांपावेतो पोहचवायची असल्याने त्या करीता आपल्या सारख्या सुविचारी मित्रांची मनापासून आवश्यकता आहे.
    धन्यवाद.... 🙏🏻

    उत्तर द्याहटवा