Breaking




जुन्नर : किल्ले चावंड येथे मेटल डिटेक्टरचा वापर करत गुप्तधन सापडणाऱ्या इसमाला पकडले

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंड या ठिकाणी मेटलच्या साहाय्याने ऐतिहासिक ठिकाणी जाऊन पुरातन काळातील वस्तूंची हेरगिरी करणाऱ्या एका इसमाला चावंड या गावातील ग्रामस्थांनी काही वस्तूंसहित पकडले आहे.


काही पर्यटक किल्ले चावंडवर गेले असता त्यांना विक्रम शांताराम हाडवळे (वय अंदाजे ४० वर्षे) असून राहणार ओतूर या इसमाकडे काही संशयास्पद वस्तू असल्याची शंका आल्याने त्या पर्यटकांनी तात्काळ चावंड पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांशी संपूर्ण साधून ही संशयास्पद माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्या इसमाची चौकशी केली, त्यावेळी त्या इसमाची बॅग तपासली असता त्याच्या जवळ मेटल डिटेक्टर, गणबुट, कुदळ, नाडा, टोकदार गज, पुरातन नाणी व तोफगोळ्याचे तुकडे आणि इतर वस्तू आढळून आल्या.


आशा येणाऱ्या लोकांना चोप दिला पाहिजे, येणाऱ्या पर्यटकांची किल्यावर जाताना तपासणी केली पाहिजे, तसेच वनविभागाने त्यावर विविध उपाय योजना केल्या पाहिजे.

 - स्वरूप शेळकंदे, पोलीस पाटील



त्यावेळी पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे व चावंड  गावातील ग्रामस्थ सोमनाथ शिंगाडे, मारुती उतळे, वसंत उतळे, दत्तू शेळकंदे, संदीप शेळकंदे यांनी शिताफीने पकडुन वनक्षेत्र अधिकारी शशिकांत मडके, वनरक्षक कवटे व वाजे यांच्याकडे पुढील कारवाईसाठी विक्रम शांताराम हाडवळे यास ताब्यात देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा