Breaking
जुन्नर : “तौक्ते चक्रीवादळा”चा मोठा परिणाम; मोठे नुकसान


जुन्नर : जुन्नर तालुक्यातहघ "तौक्ते चक्रीवादळा”चा मोठा परिणाम जाणवला. तालुक्यात कोणतही जिवीतहानी झालेली नाही. परंतु शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


तालुक्यातील पुर्व भागातील फळबागा, तसेच भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुर्व आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणावर जनावरांसाठीच्या चाऱ्याचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्याही घटना घडल्या आहे. तसेच घरांचे पत्रे, कौले उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, हातविज येथील जावजी मारुती पारधी यांच्या घराच्या छप्पराचा काही भाग उडून गेला आहे.आदिवासी भागातील हिरडा पिकाचे मोठे नुकसान 


आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या महत्वाचे उत्पादनाचे साधन असलेल्या हिरड्याचे याही वर्षी मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी "निसर्ग" चक्रीवादळामुळे हिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी अवकाळी पावसामुळे हिरड्याच्या बहर काही प्रमाणात पडल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. परंतु “तौक्ते चक्रीवादळा” मुळे पावसाचे वातावरणामुळे हिरडे तोडण्याचे काम पुर्ण थांंबले आहे. तसेच आता बाळ हिरडा वाळविण्याचे मोठे आवहान नागरिकांसमोर आहे. तसेच कुकडेश्वर येथील रामदास तुकाराम दिवटे त्याच्या आंब्याच्या फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.

  


पश्चिम आदिवासी भाग अंधारातच ...


“तौक्ते चक्रीवादळा” मुळे पश्चिम आदिवासी भाग अंधारात आहे. जोराने वाहणार वारा आणि पावसाची परिस्थिती यामुळे पश्चिम भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पुर्व भागातही काही काळ वीज पुरवठा बंद होता. परंतु आता काही भागात तो पुर्ववत करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा