Breakingजुन्नर : पुष्पावती नदीपात्रात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू !


खामुंडी : पुष्पावती नदीपात्रात मोटर सोडण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. 


खामुंडी येथील शेतकरी गणेश शिंगोटे यांचा विद्युत पंप धोलवड गावच्या जांभळपट शिवारातील पुष्पावती नदी पात्रात पाण्यात ढकलत असताना कौस्तुभ शरद गंभीर उर्फ बाळू (रा. खामुंडी), अंतिराम अंदाज भालेराव (रा. सेंदवा, मध्यप्रदेश) दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत प्रवाहाचा शॉक लागू दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस नाईक महेश पठारे, मनोज राठोड, पंकज पारखे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केला. या घटनेची ओतूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून अधिक तपास ओतूर पोलीस स्टेशन करत आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा