Breaking
जुन्नर : "ही" आहेत जुन्नर तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट गावे, प्रतिबंधक उपाययोजना गरजेच्या


जुन्नर (पुणे) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी कोव्हीडच्या अनुषंगाने हॉटस्पॉट गावातील प्रतिबंधक उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सुचना ७ मे रोजी जारी केल्या आहेत. तसेच हॉटस्पॉट गावांची यादी जाहीर केली आहे.


जुन्नर तालुक्यातील हॉटस्पॉट गावांमध्ये पिंपरी पेंंढार, येडगाव, ओतूर, डिंगोरे, पिंपळवंडी, शिरोली बु. चिंचोली, बुचकेवाडी, उंब्रज नं. १, उंब्रज नं. २, आळे, वडगांव आनंद, कुमशेत, जुन्नर नगरपालिका यांचा समावेश आहे.

राज्यात लागू करण्यात आलेले कोव्हीड प्रतिबंधक नियम अधिक कडक करण्याच्या, तसेच नागरिकांना आणि गाव पातळीवरील प्रशासनाला सुचना देण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा