Breakingजुन्नर : ओतूर येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक गोळ्यांचे वाटपओतूर (जुन्नर) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आज ओतूर मध्ये मोफत मास्क, सॅनिटायझर व रोगप्रतिकारशक्‍ती वाढीच्या आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.        


शिवसेनेचे जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते आज ओतूर मधील पत्रकाराबरोबरच  पोलिस स्टेशन व वन विभागाचे कर्मचारी यांना देखील मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 


यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुविलास गाढवे, बबनदादा तांबे, सेनेचे माजी विभागप्रमुख ऍड. संजय शेटे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा