Breaking
जुन्नर : देवळे गावात यंग ब्रिगेड आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून बसवले हायमॅक्स दिवे !


जुन्नर (पुणे) : देवळे गावात यंग ब्रिगेड आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हायमॅक्स दिवे बसविण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. 


देवळे गावात यंग ब्रिगेड पुढे येत गावच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत, त्यात ग्रामस्थांचे हि सहकार्य लाभत आहे. गावच्या विकासासाठी तरुण एकत्र येत आहेत हि आनंदाची बाब आहे.

गावातील प्रसिद्ध असणाऱ्या भैरवनाथ, मुक्ताई मंदिर येथे हायमॅक्स दिवे बसवण्यात आले. ग्रामपंचायतीचे १४, १५ वित्त आयोगाचा आराखडा बनवून गावच्या विकासाची कामे यंग ब्रिगेड झपाट्याने करण्याच्या प्रयत्नात आहे.

आज पर्यंत जी काही कामे थकीत होती, त्या कामांना गती देत पुर्ण करून घेण्यात हि तरुण पुढाकार घेत आहेत. अनेक दिवसांपासून हायमॅक्स दिव्यांची मागणी करुन ही तांत्रिक अडचणींंमुळे काम स्थगित होते. परंतु यंग ब्रिगेडच्या अन् ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

जवळपास एक लाख सहा हजार रुपये बजेट चे दोन हायमॅक्स दिवे बसुन यंग ब्रिगेड विकास कामांना गती दिली आहे. अजुनही वाड्या वस्त्यामध्ये अश्या प्रकारे दिवे बसवण्यासाठी तरुण प्रयत्नशील राहतील, अशी माहिती यंग ब्रिगेडचे अध्यक्ष धनाजी बोऱ्हाडे व सचिव रोहिदास बोऱ्हाडे यांनी सांगितले. 

तसेच हाय मॅक्स दिवे बसवण्यासाठी सरपंच इंदुबाई कोकणे, ग्रामसेवक गाडेकर यांसह यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा