Breakingजुन्नर : रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकरल्या प्रकरणी "या" हॉस्पिटलची होणार चौकशी !


जुन्नर (पुणे) : कोविड -१९ बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयाकडुन वाजवी शुल्क आकारले प्रकरणी मनिषा ग्रामीण रुग्णालय याची चौकशी होणार आहे.


कोविड - १९ बाधीत रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळणेसाठी शासनाने अधिसुचनाद्वारे खाजगी रुग्णालयांना आकारवायचे कमालदर मर्यादा निश्चित करुन दिले आहेत. 

परंतु प्रमोद दिवेकर यांनी मनिषा हॉस्पिटलमध्ये अवाजवी शुल्क आकारत असल्याचे आणि विविध मुद्दे उपस्थित करणारा तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये पीपीपी किट न वापरता त्याची रक्कम घेणे, ५०, ००० रुपये डिपॉजीट घेऊनच रुग्ण अॅडमीट करणेचा अग्रह धरणे, बिल वसुल करताना अपंग कपाऊंडरला समोर उभे करुन अरेरावी व शिवीगाळ करणे, शासकीय दराप्रमाणे बिल न बनविता जास्त दराने बिल आकारणी करणे, शासकीय दरपत्रकात लॅब, नर्सेस, याचा समावेश असतानाही त्यांचे स्वतंत्र दर आकारणे, रुग्णांनी बिलाच्या अॅडीटचा अग्रह धरल्यास रुग्णांना वेगळे आणि ऑडीटरांना वेगळे बिल देवुन दिशाभुल करणे, रेमडिसिवीरचे चुकीचे बिल आकारणे आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे. वरील मुद्यांंच्या आधारावर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी चौकशी समिती गठीत केली आहे.

तीन सदस्यी चौकशी समिती गठीत !

चौकशी समितीमध्ये नायब तहसीलदार सुधिर वाघमारे, जुन्नर नगरपरिषद लेखापाल प्रविण कापसे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक राहूल सरदे हे मनिषा ग्रामीण रुग्णालय जुन्नरची तपासणी करुन अहवाल करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा