Breaking
जुन्नर : आदिवासी भागात सर्रासपणे बेकायदेशीर माती वाहतूक सुरुच !


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात सर्रासपणे बेकायदेशीर माती वाहतूक चालू आहे. हे चालू असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही गप्प असल्याचे दिसत आहे.


एक गाडी मातीसाठी 400 ते 500 रुपये दिले जातात. पश्चिम आदिवासी भाग पेसा ग्रामपंचायती असल्यामुळे माती वाहतूक, उपसा करताना ग्रामसभेचा ठराव घेणे आणि ग्रामपंचायतीची परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु हे एकाही ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसत नाही. 


बेकायदेशीर माती वाहतूक करणारा ट्रक पलटी

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह - शिवाची वाडी येथील बेकायदेशीर मातीचा ट्रक पलटी झाल्याने संबंधित आधिकारी वर्ग यांची धांदल उडाली होती.


सविस्तर माहिती अशी की लॉकडाउन च्या कालावधीत दिवसा दोन ट्रक बेकायदेशीर माती घेऊन जात असताना एक ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यामुळे बेकायदेशीर माती वाहतूकीच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच पलटी झालेला ट्रक पंचनामा न करता जलदगतीने काढून नेण्यात आला.

आदिवासी भागातील माती वाहतूकीला लगाम घालण्याची गरज आहेच. परंतु मातीची योग्य किंमती ही मिळणे गरजेची असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र कडक लॉकडाऊन मध्ये बेकायदेशीर माती ये - जा प्रमाण वाढले आहे. याबाबत अधिकारी वर्ग गप्प का ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

अधिक वाचा : 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा