Breakingजुन्नर तालुक्यातील 'या' गावात आजपासून ६ दिवस जनता कर्फ्यू

अलदरे गावात आज पासून 'जनता कर्फ्यु' 

जुन्नर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढती कोरोना संख्या लक्षात घेता अलदरे ग्रामपंचायतीने आज गुरुवार दि. 27 मे 2021 ते सोमवार दि. 31 मे 2021 पर्यंत पुढील 5 दिवस जनता कर्फ्यु लागू केला आहे. ग्रामपंचायत नियम व अटींचे पालन करावे, असेही आवहान करण्यात आले आहे.


सोशल डिस्टडिंग, मास्क,  सॅनिटाईजर चा वापर करा, जनता कर्फ्यु पालन करा आणि कोरोनाला हद्दपार करा, गावातील दुकाने, हॉटेल्स व इतर गोष्टी सर्व बंद असेल तसेच विनाकारण घरा बाहेर पडल्यास 500 रु. तर विना माक्स 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

गावळ्यांनी दुधाला येतांनी माक्स चा वापर करा, विनाकारण जुन्नर किंवा इतर ठिकाणी फिरू नका, एकमेकांच्या घरी येणेजाणे टाळा, विनापरवाना बाहेरून कोणी आल्यास आरोग्य विभाग/ग्रामपंचायतला माहिती द्या, सार्वजनिक ठिकाणी बसू नका, विनाकारण बाहेर पडू नका, पडल्यास मास्क लावणे आवश्यक असल्याचे आवहान करण्यात आले आहे.

अलदरे ग्रामपंचायत सरपंच सविता सरजिने, माजी सरपंच निलेश सरजिने, पोलीस पाटील सुमित लोहटे, चेअरमन संतोष सरजिने यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते संदीप सरजिने, दिपक सरजिने, पंकज सरजिने यांच्या सहकार्यतून जनता कर्फ्यु मध्ये मदत लागल्यास यांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा