Breaking
जुन्नर : देवळे (मधली वाडी) येथे विजेचा पोल कोसळण्याची शक्यता !


देवळे (जुन्नर) : मधलीवाडी येथे विजेचा प्रश्र्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहेे. येथील विजेचा पोल वाकलेला असून कधीही कोसळण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. वेळोवेळी महावितरण कर्मचारी यांना ग्रामस्थांकडून या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही हा प्रश्न अनुत्तरित आहे.


गावामध्ये नवीन डी. पी. तसेच संपूर्ण गावाची विजेच्या पोलची नविन लाईन करण्यात यावी, यासाठी महावितरणला निवेदन देण्यात आले आहे. असं असताना कोणत्याही प्रकारे लक्ष या समस्याकडे दिलं जात नाही, नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

वेळोवेळी महावितरणला या गंभीर समस्या विषयी जाणीव करून देऊनही महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केलं जातं आहे. पुढे काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल, पावसाळ्यात दरवर्षी विजेची समस्या गावला भेडसावत असते. पूर्णपणे गंजून गेलेल्या विज लाईन कोसळून गावामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे, असं "महाराष्ट्र जनभूमी"शी बोलताना यंग ब्रिगेडचे उपाध्यक्ष रोहिदास बोऱ्हाडे म्हणाले.

पावसाळ्यात विजेच्या समस्या, त्यात जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात कोसळणारा मुसळधार पावसामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. लवकरात लवकर विजेची समस्या पूर्णपणे महावितरणने सोडवावी, अन्यथा ग्रामस्थ व गावातील यंग ब्रिगेडच्या वतीने योग्य पाऊल उचलावे लागेल, असेही बोऱ्हाडे म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा