Breakingजुन्नर : खटकाळे येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा काळे झेंडे उभारुन केला निषेध !


जुन्नर (पुणे) : खटकाळे (ता. जुन्नर) येथील रोजगार हमीचे कामगार व ग्रामस्थांनी केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


यावेळी कामगार व ग्रामस्थांनी हातात काळे झेंडे धरुन देशव्यापी 'काळा दिवस' पाळत निषेध व्यक्त केला. आज (दि.२६) रोजी कामगार व शेतकरी संघटनांनी देशव्यापी निषेध दिन व काळा दिवस पाळण्याचे आवहान केले होते. याला तालुक्यातील ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळाला.

यावेळी सचिन मोरे, मोहन मोडक, अमोल मोडक, किसन मोडक, हर्षदा मोडक, मनीषा मोडक व अन्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा