Breakingजुन्नर : शितळेश्वर विद्यालयाचे पत्रे उडाले, इतरही नुकसान !जुन्नर (पुणे) : शितळेश्वर विद्यालय सितेवाडी (ता. जुन्नर) या शाळेचे पत्रे उडाले. तसेच फर्निचर, कॉम्प्युटर सेटचेही नुकसान झाले आहे.


जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागामध्ये येणाऱ्या या शाळेला "तोक्ते" चक्रीवादळाचा फटका बसला आहे. गेल्या वर्षीही "निसर्ग" चक्रीवादळामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी मदत स्व:निधी जमा करुन  शाळेचा दुरुस्तीचे काम केले होते. परंतु याही वर्षी  "तोक्ते" चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शाळेला त्वरित नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा