Breaking
जुन्नर : काळू गागरे आणि किसान सभेच्या प्रयत्नांना यश, ग्रामरोजगार सेवकांचे मानधन जमा होणार !


जुन्नर : पंचायत समिती सदस्य काळू गागरे आणि अखिल भारतीय किसान सभेच्या प्रयत्नांना यश आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अखेर जमा होणार आहे.


जुन्नर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींतील ग्राम रोजगार सेवक यांचे सन 2018-19, 2019-20 व 2020-21 या वर्षातील रक्कम रुपये 11 लाख 79 हजार 254 रुपये रक्कम पंचायत समितीस प्राप्त झाली असून लवकरच ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अदा केले जाईल.

तसेच 38 ग्रामपंचायतींनी मागणी केल्यानुसार सन 2018-19 ची रक्कम 1,49,606 रचपये सन 2019-20 ची रक्कम 37,488 रुपये व सन 2020-21 ची रक्कम रुपये 5,95,155  एकूण रक्कम रुपये 6,82,249 एवढी रक्कम ग्रामपंचायत खात्यावर वर्ग करण्यात अली आहे.

ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनासाठी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव अमोल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी हे सातत्याने पाठपुरावा करत होते. तसेच पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी देखील प्रशासनाशी पाठपुरावा केला. त्यामुळे यश आल्याचेही ग्रामरोजगार सेवकांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा