Breaking
जुन्नर : देवळे येथील यंग ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद - संतोष बोऱ्हाडे


देवळे (जुन्नर) : देवळे गावात मुक्ताई मंदिर आणि श्री.भैरवनाथ मंदिर याठिकाणी हायमँक्स बसून देवळे गावातील विकास कामांसाठी युवा पिढी पुढे येत आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन असेच कामे केले तर आपल्या गावातील विकास हा नक्की होणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यंग ब्रिगेडचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे, असे उद्गार मनसे पिंपरी चिंचवड शहर विधानसभा उपाध्यक्ष संतोष मारुती बोऱ्हाडे यांनी काढले.


बोऱ्हाडे म्हणाले, देवळे गावातील युवा पिढीला माझ्या कडून शुभेच्छा तसेच त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सर्व जण राजकारण, पक्ष बाजूला ठेऊन गावातील विकासासाठी एकत्र येऊ. असेच कामे करत रहा,आपल्या गावाचा विकास नक्की होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा