Breaking


“राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही” खासदार संभाजीराजेंवर या भाजप नेत्याची टीकामुंबई : सध्या  खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र दौरा करत आहे, या दौऱ्या दरम्यान अनेक विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खास. शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु या भेटी नंतर भाजपच्याच काही नेत्यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी खास. संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे कि, संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महा विकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.  


तर आमदार विनायक मेटे यांनी खासदार शरद पवार यांच्या भेटीवर म्हटले आहे कि, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर कशी काय चर्चा झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा