Breaking
सट्टेबाजांवर कारवाई करण्याची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणीकोल्हापूर : सट्टेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जगभरामध्ये कोरोनाचे थैमान चालू आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे याला आपले कोल्हापूरही अपवाद नाही. लोकांचे उद्योगधंदे चालू बंद अवस्थेत आहेत, आर्थिक चक्र मंदावले आहे. यापेक्षा भयंकर वेदना आणि चटके सर्वसामान्य जनता सहन करीत असताना अचानक रोजच्या जेवणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या खाद्यतेलाचे आणि डाळीचे दर दररोज वाढून गगनाला भिडले आहेत, सामान्यांचे जीने हराम झाले आहे. आपल्या केंद्र सरकारने सन २०१९ पूर्वी खाद्यतेल व खाद्य डाळी या वस्तू जीवनावश्यक यादीतून वगळून खुल्या बाजारासाठी खरेदी विक्रीसाठी खुला केल्यामुळे नोव्हेंबर २०२० पासून खाद्यतेलाचे भाव १३४ रुपयांंवरुन १९५ ते २०० रुपयापर्यंत महागले आहेत. 


तसेच खाद्य डाळी सप्टेंबर २०२० मध्ये ८० ते ९० रुपये असणारा दर आपण १२० रचपयांच्या पुढे गेला आहे. खुल्या मार्केटमध्ये तेल आणि डाळींची या दरामध्ये विक्री होत आहे. त्यामध्ये सामान्य माणूस भरडून निघाला आहे. 


जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्य जनतेला परवडेल असे कमी करुनपूर्वीप्रमाणे शासनाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत याचा समावेश करुन जनतेला न्याय द्यावा, तसेच संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत खाद्यतेल व डाळी रेशनकार्डावरती उपलब्ध करुन दयाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच दररोज तेलांचे वाढते भाव पाहून जनतेच्या मनात शंका येते की ही जी भाववाढ आहे ती कृत्रिम आहे का? साठेबाजी आहे का याचीही शासनाने चौकशी करावी आणि या महामारीच्या काळात खाद्य तेल व डाळीची माफक दरात विक्री करुन जनतेचे जगणे सुसहाय्य करावे, अशी विनंती कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, भाऊ घोडगे, लहुजी शिंदे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा