Breaking

कोल्हापूर : मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरूण मंडळाच्या वतीने मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत शिवजन्म काळ संपन्न


कोल्हापूर : मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे यांची शिखर संस्था मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने मिरजकर तिकटी चौकात शासकीय नियम पाळून सुशीला देसाई, लता डवरी, वासंती घोरपडे, दिपाली धनवडे, शिल्पा सरवदे, सुशीला देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पाळणा म्हणण्यात आला.


तसेच ध्वज वंदन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शुभहस्ते झाले. त्याप्रसंगी मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्थेचे प्रतिनिधी तसेच बाबुराव चव्हाण, आनंदराव पायमल, अशोक पवार, रमेश मोरे, संदीप चौगुले, बापू आवळे, बाबा पार्टे, पप्पू सुर्वे, सतीश जोशी, किरण पवार, विजय पवार, सुनील पाटील, जयकुमार शिंदे, शैलेश साळुंखे, संजय साळुंखे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा