Breaking
लक्कडकोट नवीन वसाहत सात वर्षापासून अंधाऱ्यात, विद्युतीकरण करण्याची मागणी


तळोदा
: लक्कडकोट नवीन वसाहत येथे लाईटची सोय करून मिळावी यासाठी उपकार्यकारी अभियंता तळोदा यांना ग्रामस्थांनी निवेदन देवून मागणी केली आहे. 

लक्कडकोट येथील ग्रामस्थांची घरे ही पुर्वीपासूनच स्वतः चा शेतात होती. प्रत्येकांची कुटुंब संख्या वाढल्याने शेतात घरेही वाढली. शेतात अधिक वस्त्यामुळे जमीन कमी होऊन उदरनिर्वाह करण्याइतके सुध्दा उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे गेल्या ७ - ८ वर्षापासून गावठाण म्हणून लक्कडकोट धरणाचा पायथ्याशी नवीन वसाहत निर्माण केली आहे.

सध्या त्या ठिकाणी ६० ते ७० घरांची वस्ती आहे. परंतु, अद्यापही विजेची सोय नाही. निवेदनावर राजेंद्र पाडवी, संजय पाडवी, सुरेश पाडवी, कुवरसिंग वळवी, तापसिंग पाडवी, राजू वळवी, सुनील पाडवी अश्या ४५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा