Breakingलातूर : किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध !


लातूर दि.२६ : केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज (दि. २६) किसान संघर्ष समन्वय समिती वतीने काळ्या फिती हाताला बांधून व काळे झेंडे दाखवून निषेध दिन करण्यात आला .


केंदातील मोदी सरकारची अत्यंत वाईट कारकीर्द सात वर्ष पुर्ण करत असताना व दिल्लीच्या सिमेवर लाखो शेतकरी शेतकरी विरोधी तीन कायदाच्या विरोधात ठाण मांडून बसले आहेत. अशी परिस्थिती असताना देखील भाजपचे मोदी सरकार शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द न करता देशातील लोकशाही व्यवस्था मोडकळीला आणून देश अदानी, अंबानीच्या दावणीला बांधत आहे, अशी टिकाही यावेळी करण्यात आली.

यावेळी अॕड.भाई उदय गवारे, भाई दत्ता सोमवंशी, अॕड.भाई सुशील सोमवंशी, अॕड.भाई भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील, राजकुमार होळीकर, अॕड.शाबुद्दीन शेख, सुनील मंदाडे, नामदेव बामणे, उल्हास गवारे, पवनराज पाटील हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा