Breakingकेरळ मध्ये पुन्हा डावे ; पिनराई विजयन यांनी घडवला इतिहासतिरुअनंतपुरम  : देशातील पाच राज्यांचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये केरळचा वेगळा निकाल बघायला मिळाला. केरळात पहिल्यांदाच सत्तांतराचा इतिहास बाजूला ठेवत एलडीएफकडे दुसऱ्यांदा राज्याची सत्ता सोपवली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील मार्क्सवादी नेत्याला जनतेने पसंती देत मतदारांनी भरघोस मतदान केल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.


सध्या एलडीएफ 99 जागांवर आघाडीवर असून, केरळमध्ये पुन्हा कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार बनेल असे चित्र दिसत आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला हे 41 जागांवर आघाडीवर आहे. तसेच भारतीय जनता पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहे.


मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सत्तांतर होतं आलं आहे. चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं आहे. त्यामुळे विजयन यांनी केरळमध्ये एक नवीन रेकॉर्डच बनवले आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी करोना आणि महापूर काळामध्ये केलेल्या विशेष कामाला जनतेने पसंती दिल्याचे दिसून येत आहे.


अधिक वाचा


पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दमदार विजयाकडे वाटचाल ; मात्र नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा