Breaking



१ जूनला लॉकडाउन वाढवणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे विधान



मुंबई : राज्यातील कोरोनाची काहीशी परिस्थिती नियंत्रणात येत आहे, मात्र १ जूनला पुन्हा राज्यातील लॉकडाऊन वाढवणार का यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौते चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी गेले असता रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केले आहे.


राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला'.


“सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”. असे मुख्यमंत्री म्हणाले.


त्यामुळे १ जून नंतर पुन्हा राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा