Breakingकोविड सेंटरमध्ये आजींसोबत आमदार रोहित पवार यांनी धरला 'झिंगाट' गाण्यावर ठेका


अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सध्या वेगवेगळ्या कोव्हिड सेंटर भेट देत आहेत तसेच रुग्णांची आणि अहोरात्र रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि नर्स यांच्याशीही चर्चा करत आहे. हे सर्वजण अत्यंत चांगलं काम करत आहेत असे रोहित यांनी म्हटले आहे. अशाच एका कोव्हिड सेंटरला भेट दिली असता रोहित पवार यांनी रुग्णांसोबतच ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ रोहित पवार यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. असे ट्विट रोहित यांनी केले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा