Breaking
खा. भारती पवार यांचा इशारा, अजून वेळ गेलेली नाही, डोळे उघडा; मोकाट फिरु नका


सिमावर्ती भागातील अतिदुर्गम पिंपळसोंड येथे उपआरोग्य केंद्राची व्यवस्था करणार


सुरगाणा (दौलत चौधरी) : अजूनही वेेेळ गेलेली नाही, डोळे उघडा, मोकाट फिरु नका. तिसरी लाट आली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशा इशारा खासदार डॉ. भारती पवार यांनी पंचायत समिती सभागृहात कोविड परिस्थिति आढावा बैठकीत दिला.  

सद्या कोरोना संक्रमण हे भयानक स्थितीत जाऊन पोहोचले असून सगळीकडे चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. यावर आरोग्य यंत्रणेने कडून काय  
 उपाययोजना करण्यात आली आहे, याबाबत अधिक माहिती घेतली.

लोक लस घेण्यास घाबरत आहेत. लसीकरणाबाबत अनेक गैरसमज निर्माण केले आहेत. जनतेचे मत परिवर्तन कसे करता येईल या करीता गावातील शिक्षक, पोलीस पाटील, आशाताई, अंगणवाडी,  ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी तसेच त्यांच्या  कुटुंबातील सदस्यांनी लस घेतली का ? याची गाव निहाय माहिती संकलन करण्याचा सुचनाही पवार यांनी दिल्या.

अधिकाधिक चांगल्या सुविधा रुग्णांना कशा देता येतील, याकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यासाठी पुरेशी बेडची व्यवस्था करा. सध्या कोव्हीडचे रुग्ण किती प्रमाणात असून त्याच्या उपचारासाठी काय काय आणि कुठे व्यवस्था केली आहे ह्याची सविस्तर माहिती घेतली व त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरणासाठी प्रयत्नशील असल्याचं खा.डॉ भारती पवारांनी सांगितले. 

जलपरिषद सदस्य रतन चौधरी म्हणाले, पिंपळसोंड येथील सिमावर्ती गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात गुजरात मधून पांगारणे येथे जावे लागते. त्यांना प्रवेश दिला जात नाही, अशी समस्या मांडली असता पिंपळसोंड येथे अॅन्टीजन टेस्ट करण्याचे आदेश दिले.

यावेळी सुरगाणा तहसीलदार किशोर मराठे, सभापती मनिषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, जि.प.सदस्या ज्योती जाधव, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, काशिनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्या एन.डी.गावित, विठ्ठल गावित, रतन चौधरी, गणेश पाटील, सचिन महाले, दिनकर पिंगळे, राजेंद्र निकुळे, मनोहर जाधव आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा