Breakingमराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी केली महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवातकोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले आहे. 


आज संभाजीराजे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते म्हणाले कि, बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तसेच या दौऱ्या दरम्यान मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी व त्या राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, आरक्षणाचे अभ्यासक, इतिहास संशोधक, विविध क्षेत्रातील विचारवंत तसेच इतर समाजातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधला मराठा आरक्षणाविषयी सर्वांची मते जाणून घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा