Breaking
१ मे पासून देशात अनेक आवश्यक बदल


पुणे :  १ मे पासून देशात अनेक आवश्यक बदल होत आहेत. या बदलात अनेक असे बदल आहेत जे टेक्नोलॉजीशी संबंधित आहेत. त्यामुळे युजर्संना याची माहिती असणे आवश्यक आहे. १ मे २०२१ पासून त्यांच्या आयुष्यात काय-काय बदल झालेले आहेत. किंवा होणार आहेत, हे सर्वांना माहिती असणे आवश्यक आहेत. जाणून घ्या डिटेल्स.


WhatsApp ची नवीन प्रायव्हसी पॉलिसी :

या लिस्टमध्ये टेक जगातून सर्वात मोठा बदल म्हणजे सर्वात जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप संबंधीत आहे. खरं म्हणजे, WhatsApp ने लोकांना आपली प्रायव्हसी पॉलिसीला अॅक्सेप्ट करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही आतापर्यंत WhatsApp प्रायव्हसी पॉलिसीचा वापर केला नसेल तर १५ मे पर्यंत तुम्हाला WhatsApp च्या नवीन पॉलिसीला अॅक्सेप्ट करणे भाग आहे. तुम्ही असे केले नाही तर १५ मे नंतर तुमचे WhatsApp चे अकाउंट डिलीट होईल. तुम्हाला त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे कंपनीकडून लागोपाठ आपल्या युजर्संना त्यांची पॉलिसी अॅक्सेप्ट करण्यासाठी अलर्ट करीत आहेत.


१८ वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना लससाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार !

१ मे पासून १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या लोकांना लस दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नंतर लसची तारीख, जागा, आणि हॉस्पिटलचे नाव माहिती होईल. यावेळी सर्वांना लससाठी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या लससाठी तुम्ही CoWIN आणि Aarogya Setu अॅपवरून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. आरोग्य सेतू अॅप आणि कोविन वर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सारखीच आहे.


लॉगइन/रजिस्टर वर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफाय होईल. त्यानंतर तुमचे आधार, पॅन, ड्रायविंग लायसन्स सारख्या कोणत्याही एका फोटो आयडी कार्डपैकी एकाची निवड करा. त्यानतील नाव, जन्मतारीख सारखी माहिती भरा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. ज्यावर तुम्ही ४ आणखी लोकांची लस देण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर नावे जोडू शकता. यानंतर तुम्ही पिन कोड टाका. समोर लस सेंटरची माहिती ओपन होईल. यात तुम्हाला लसची वेळ आणि तारीख मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा