Breaking
२४ मे : आशा व गटप्रवर्तकांनी देशव्यापी संप यशस्वी करावा - आनंदी अवघडेसातारा : आशा व गटप्रवर्तकांनी २४ मे रोजी होणारा देशव्यापी संप यशस्वी करावा, असे आवहान आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राजाध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांनी केले आहे. 


कॉ. अवघडे म्हणाल्य की, गेले वर्षभरापासून आशा व  गटप्रर्वतक या कोविडचे काम अहोरात्र, जिवावर उदार होऊन करीत आहेत. दुस-या बाजूला गावातील लोकांची, व आरोग्य विभागाची दादागिरी सहन करीत आहेत, स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य कोरोना ने बाधित झाल्यास आरोग्य  विभागातील कोणीही  मदत करीत नाहीत. बेड मिळेल यासाठी कोणी मदत करेल याची खात्री नाही. सध्या आशांना सँनिटायजर, मास्क सुध्दा मिळत नाहीत, विमा संरक्षण नाही, औषधोपचार साठी, सरकार काही देत नाही अशा बिकट अवस्थेत देशभरातील आशा व गटप्रर्वतक काम करीत आहेत. 


आशा व गटप्रवर्तकांना न्याय  मिळावा यासाठी  CITU ने देशभरात एक दिवसांचा संप 24 मे 2021 रोजी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात ही आपण हा संप 100 टक्के करणार आहोत. तरी त्यासाठी सर्वानी दोन दिवसांत संपाची नोटीस जिल्हा, तालुका, व प्राथमिक आरोग्यकेंद्राला द्यावी. आरोग्य केंद्राला नोटीस देताना त्या आरोग्य केंद्रातील सर्व आशांनी त्या नोटीसवर सह्या कराव्या व नोटीस दिल्यानंतर त्यांची माहिती संघटनेच्या प्रमुखांना द्यावी, असेही आवहान केले आहे.


तसेच 24 तारखेला कोणीही कोणत्याही प्रकारचे काम, सर्वे, प्रशिक्षण, लसीकरण मोहिमेत आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार नाही व त्या  दिवशी गांवपातळीवर, पीएचसीवर, तहसिल कचेरीवर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, शक्य असेल त्या ठिकाणी  आंदोलन करण्यात येईल, असेही आनंदी अवघडे म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा