Breaking




सरकारी कर्मचारी बिरसा क्रांती दलात, मोहन गावित यांची सुरगाणा तालुका अध्यक्षपदी निवड


सुरगाणा : तालुक्यातील सरकारी कर्मचारी मोठ्या खुशीने बिरसा क्रांती दलात दाखल झाले. बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशीलकुमार पावरा आणि नाशिक विभाग प्रमुख व अध्यक्ष मनोज पावरा यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका कमिटीची निवड करण्यात आली. 


सुरगाणा तालुका अध्यक्षपदी मोहन गावित यांची निवड करण्यात आली. सुशीलकुमार पावरा याचे कामाची दखल घेत सुरगाणा तालुक्यातील नोकरदार वर्ग एकवटले आहेत. यांना एकत्र करण्याचे काम गणेश गायकवाड व बळवंत पाडवी यांनी केले.

मोहन गावीत हे माध्यमिक शिक्षक असून उच्च शिक्षित आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघून सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड  करण्यात आली आहे. 

तालुका शाखा सुरगाणा पुढीलप्रमाणे :
            
तालुका अध्यक्ष मोहन गावित, उपाध्यक्ष अशोक गायकवाड,तुळशीराम गावित, सचिव बळवंत पाडवी, कार्याध्यक्ष भास्कर गायकवाड, कोषाध्यक्ष चुनीलाल  घांगळे, हेमंत चौधरी, सहसचिव महेंद्र देशमुख सल्लागार तुकाराम अलबाड, महिला प्रतिनिधी सुनंदा गायकवाड, तालुका संघटक नितीन धूम, योगेश  भोये, प्रसिद्धी प्रमुख गणेश गायकवाड, योगेश वाघमारे, सदस्य दिनेश पवार, गोपाळ गायकवाड, नारायण चौधरी, प्रमोद वाघमारे, अशोक देशमुख, हिरामण गायकवाड, सुनील गुंबाडे याप्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली.

यावेळी सुशीलकुमार पावरा, चिंधू आढळ, वसंत पावरा, मधुकर पाडवी, दादाजी बागूल हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा