Breaking


बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस हा बुरशीच्या दोन प्रजातींमुळेच


शास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व संशोधिका अमृता शेटे मांडे यांचे संशोधन


बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्यात आढळून आलेल्या म्युकर मायकोसिसने बाधित रुग्णाचे ऑपरेशन यशस्वीपणे बार्शी येथील लीला नर्सिंग होम चे इ. एन. टी. सर्जन डॉ. तरंग शहा यांनी केले. या रुग्णाचे क्लिनिकल सॅम्पल चे संशोधन बार्शी येथील सूक्ष्मजीव शास्त्राचे संशोधक डॉ  सुहास कुलकर्णी व अमृता शेटे मांडे यांनी केले असता, सदर म्यूकर मायकोसिस हे बुरशीच्या दोन प्रजातींच्या प्रादुर्भावामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

रुग्णातील सायनसच्या क्लिनिकल सॅम्पल मधील बुरशीचे प्रक्रियेनंतर मायक्रोस्कोप खाली सूक्ष्म निरीक्षण केले असता त्या मध्ये दोन प्रकारच्या बुरशींच्या प्रजाती सापडल्याचे अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.

रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये आढळलेल्या दोन्हीं प्रजाती भिन्न प्रकारच्या  व एकत्रित आढळल्या आहेत. प्रजाती क्रं१ही ८०% तर प्रजाती क्रं २ ही २०% प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.हे निरीक्षण रुग्णाच्या आरोग्याच्या हितासाठी व पुढील उपचाराची दिशा ठरविण्या करीता अत्यन्त महत्वाचे असल्याचे डॉ. सुहास कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले.आतापर्यंत म्युकरच्या ४० प्रजातींची नोंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संशोधनात आढळलेल्या दोन प्रजाती याप्रमाणे
प्रजाती क्रं १: या प्रजातीमध्ये मायसेलिया, स्पोऱ्यांनजीओफोर, स्पोऱ्यांनजियम व असंख्य स्पोअर्स आढळले आहेत 
प्रजाती क्रं २: या प्रजातीमध्ये स्पोऱ्यांनजीओफोर तसेच स्पोऱ्यांनजियम आढळले नसून ,स्पोअर्स एक विशिष्ट रचनेत डायरेक्ट मायसेलियाच्या पृष्ठभागावर आढळले आहेत.

कोण आहेत संशोधक :

1. डॉ. सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ व संशोधक आहेत. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक तसेच मराठी विज्ञान परिषद शाखा बार्शीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे ५० पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रसिध्द झाले असून १५ नवीन शोध लावले आहेत.

2. अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा